शहापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉक डाऊनच्या काळात मोलमजुरी करणारे गरीब, गरजू आणि आदिवासी समाजाचे होणारे हाल पाहता त्यांना याक्षणी मदतीची गरज आहे. आयुष्यभर रात्रंदिवस काबाडकष्ट करून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे या काळात खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. हे जाणून आज जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्या वाढदिवशी वाऱ्याचापाडा येथील गरजवंत एकूण ३५ कुटुंबाना सोशल डिस्टनसिंग तसेच शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून प्रत्येक घरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष व शहापूरचे पाणीपुरवठा सभापती श्री हरेश पष्टे यांनी जि प शाळा वाऱ्याचापाडा शाळेस प्रिंटर घेण्यासाठी ८०००/- रुपयांचा धनादेश मा. आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते दिला. वाटप उपक्रमाला शहापूरचे मा.आमदार पांडुरंग बरोरा, तालुका प्रमुख मारुती धिर्डे , जिजाऊ संस्थेचे हरेश पष्टे , सरपंच प्रतिक्षा मेंगाळ, सदस्य विठ्ठल शिवारे, शिक्षक प्रमोद पाटोळे व शिक्षक मित्र सुनील मेने उपस्थित होते.
आज पालघर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली संस्थापक अध्यक्ष मा.निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या वाढदिवानिमित्त ठाणे व पालघर जिल्ह्यात २५००० गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
खूप खूप धन्यवाद प्राजक्त