अहमदनगर : राज्यात कोरोना संसर्गाने परिस्थिती बिकट बनली असल्याने शासनाने या काळात सर्वत्र लॉकडाऊन केले असून राज्यातील पोलीस, आरोग्य, बँक कर्मचारी इ सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत.
आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या प्रति सहानुभूती दर्शवत व सामाजिक बांधिलकी जपत अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने कर्जत येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी बांधवांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप शासनाचे नियम पालन करत करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांचे सामान्य जनतेच्या हितासाठी करत असलेल्या कार्याबद्दल आभार मानण्यात आले. तसेच पोलीस व बँक कर्मचाऱ्यांकडूनही प्रतिष्ठानच्या या उपक्रमाबद्दल आभार मानण्यात आले. यानंतर परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे अळसुंदे येथील किराणा, रेशन दुकानदार यांनाही सॅनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ अनारसे, सचिव तुळशीराम गदादे, सदस्य रविंद्र अनारसे, तात्या भिसे आदी उपस्थित होते.