| कोल्हापूर | कोरोनाचे थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक रुग्ण झाले आहेत, तर अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, तर पुण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्यात अडकलेले नागरिक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. पण पुढचे ४ दिवस मुंबई, पुणे आणि रेड झोनमधल्या नागरिकांना कोल्हापूरला पाठवू नका, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. सतेज पाटील यांनी पोलीस महासंचालकांना ही विनंती केली आहे. तसेच खूपच गरज असेल तरच परत या अन्यथा व्यवस्था असेल तर तिथेच रहा, अशी हाक त्यांनी कोल्हापूर बाहेर असणाऱ्या कोल्हापूर करांना दिली आहे.
कोरोनाच्या काळात प्रत्येकाला आपापल्या घरी जाण्याची ओढ आहे.पण, मुंबई, पुणे व अन्य रेड झोनमधून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की,आपण जिथे आहात तिथे आपली व्यवस्था असेल तर कृपया आपण तिथेच राहून काळजी घ्यावी. https://t.co/IpfNfBXowO
— Satej (Bunty) D.Patil (@satejp) May 16, 2020
मुंबई-पुण्याहून ८६ हजार लोकं कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यातले १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोल्हापूरकरांना याची काळजी घ्यावी लागणार आहे, असं सतेज पाटील म्हणाले. रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब घ्यायचा निर्णय आम्ही घेतला, या निर्णयाचा फायदा आम्हाला होत आहे, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे.
रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हायवेवरूनच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. हॉस्पिटलमध्ये त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि त्यांना २४ तास क्वारंटाईन ठेवलं जात आहे. या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच आम्ही त्यांना सोडत आहोत. याच पद्धतीमुळे आम्हाला १० ते १२ रुग्ण सापडल्याची माहिती पाटील यांनी दिली.- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा