| ठाणे | कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात. तसेच या चाचण्यांच्या निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील, याकरिता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आले असून कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची स्वत:ची पहिली कोविड१९ टेस्टिंग लॅब कल्याण – डोंबिवली महानगरपालिका आणि क्रशना डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी तत्वावर सुरु करण्यात येत आहे. गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये सदर लॅब उभारण्यात येत असून आज या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आढावा घेतला. याप्रसंगी महापौर विनिता राणे, माजी महापौर व स्थानिक नगरसेवक राजेंद्र देवळेकर, विश्वनाथ राणे व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या लॅबमध्ये दररोज ३००० चाचण्या करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज (#NABL) या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांच्या निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .