| मुंबई | शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालयासमोरच “भाजप प्रदेश कार्यालय” म्हणून बँनर लावले आहेत. सेना भवनसमोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
एकीकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली… ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असं पोस्टर लावून शिवसेनेनं कृतीतून भाजप तसंच ईडीला टोला हाणला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे.
‘ईडीच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर सरकार पाडण्यासाठी सातत्याने आपल्याला धमकावलं जात असल्याचा’ गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
‘ईडीच्या कार्यालयात गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे काही नेते सतत जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या २२ आमदारांची यादी आपल्याला दाखवण्यात आली. या २२ जणांना नोटीसा पाठवून नंतर अटकेची टांगती तलवार ठेऊन राजीनामे घेण्याचा कट रचला जात आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे.
‘ईडीचा गेल्या महिन्याभरापासून आपल्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं त्यांना आपण दिली पण हा संदर्भ त्यांनी सांगितला नाही, मग हे पीएमसी बँकेसंदर्भात आहे हे भाजपच्या माकडांना कसं समजलं.’ असा सवाल त्यांनी केलाय.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .