| मुंबई | कोरोना काळात देश व राज्य विविध संकटांना सामोरे जात असताना शासनयंत्रणेसोबत खांद्याला खांदा लावून कोरोना शी मुकाबला करण्याचे काम शासकीय कर्मचारी करत आहे. कोव्हिडयोद्धा म्हणून कधी टाळ्या, थाळ्या वाजवून, तरी कधी दिवे लावून तर पुष्पवर्षा करून शासनाने जनते च्या माध्यमातून कोव्हिडयोद्धांचे अाभार मानलेले आहेत, तरी सुद्धा या कर्मचार्यांचे काही प्रश्न मात्र अनुत्तरीत चं आहेत.
कोरोनाच्या काळात कधी दवाखान्यात तर कधी पोलीस पोस्ट वर, रस्त्यावर तर कधी स्वच्छता करत असताना कोव्हिडयोद्धा आपल्या आरोग्य सुद्धा धोक्यात टाकत आहे. यासाठी प्रोत्साहन म्हणून तर फार उपाय झाले पण दुसरीकडे वर्षभराचा महागाई भत्ता मात्र केंद्राप्रमाणेचं राज्यानेही गोठवलेला आहेत.
याशिवाय १ नोव्हेंबर २००५ नंतर राज्यात रूजू झालेल्या कर्मचार्यांची मात्र फारच मोठी समस्या आहे जी म्हणजे जुनी पेंशन नसणे. कोरोना शी मुकाबला करीत असताना दर समजा काही बरेवाईट झाले तर जुन्या पेंशन च्या अभावी परिवाराचे काय ? या विवंचनेत हा कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. सीमेवर देशाच्या दुश्मनाशी लढणारा सीअारपी़एफ चा जवान असो, कोरोना शी लढणारा डॉक्टर, आरोग्यसेवक वा सफाई कर्मचारी असो सुरक्षा पुरविणारा पोलीस व रेडझोन मध्ये तर कधी चेकपोस्ट वर काम करणारा शिक्षक असो १ नोव्हेंबर २००५ च्या नंतर जर तो सेवेत लागलेला असेल तर त्याला जुनी पेंशन योजने चे कोणतेही लाभ अनुज्ञेय नाही. एकीकडे प्राण धोक्यात टाकून काम करायचे आणि दुसरीकडे मात्र या अन्यायकारक योजनेमुळे हा कोव्हिडयोद्धा हवालदिल झालेला आहे….
#RestoreOldPension मोहीम..
महाराष्ट्रात मागील ५ वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना तर देशपातळीवर NMOPS ही संघटना डीसीपीएस आणि एनपीएस या योजेनेच्या विरोधात संवैधानिक मार्गाने आंदोलन करीत असून याचं आंदोलनाचा पुढील भाग म्हणजे #RestoreOldPension हे ट्विटरवरील आंदोलन. या ट्विटर वॉर द्वारा आंदोलनकर्ते शासनाच्या लक्षात आणून देणार आहे की कशाप्रकारे एनपीएस व डीसीपीएस ही योजना फसवी आहे आणि अन्यायकारक आहे. समान न्याय, समान वेतन या उक्तीप्रमाणे सर्व कर्मचार्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी संपुर्ण देशातील कर्मचार्यांची आहे.नको पुष्पवर्षा हवी फक्त जुनीपेंशन आंदोलन
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे चे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्यसचिव गोविंद उगले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध आंदोलन आतापर्यंत जुन्या पेंशन च्या मागणीसाठी यशस्वी झाली. आक्रोश मोर्चा ते अगदी अर्धनग्न मोर्चा द्वारा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने विविध आंदोलन केलीत आणि अजुनही संवैधानिक मार्गाने करतचं आहे. यासाठी संघटनेमधील राज्यस्तरावरील सर्व पदाधिकारी ज्यात प्राजक्त झावरे पाटील, आशुतोष चौधरी, अमोल शिंदे, बाजीराव मोढवे , कुनाल पवार, प्रविण सरगर, योगेश थोरात, नवनाथ धांडोरे, राम शिंदे, प्रशांत लंबे, विनायक चौथे, प्रकाश कोळी यांच्यासह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष,जिल्हा वा तालुका पदाधिकारी, संघटनेची सोशल मिडिया टीम आणि ट्विटर टीम सज्ज झालेली असून उद्या महाराष्ट्रात #RestoreOldPension ह्या हॅशटॅग सह ट्विटर वॉर होणार आहे.
शिक्षक व पदवीधर आमदारांचे समर्थन
या ट्विटर वॉर आंदोलनाला मा. दत्तात्रय सावंत यांच्यासह श्रीकांत देशपांडे, बाळाराम पाटील, किशोर दराडे, कपील पाटील, विक्रम काळे यांचे समर्थनार्थ पत्र दिले असून कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशन योजनेला ह्या सर्वांनी आपला पाठींबा दर्शविलेला आहे..
कोरोनाकाळात आपल्या प्राणाची व परिवाराची काळजी न करता काम करणाऱ्या समस्त कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन रूपी पुष्पवर्षा करून शासन न्याय देईल का हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
आपले सरकार आले की जुनी पेंशनबाबत उलट विधान करायची . हे प्रत्येक पार्टीचे झाले आहे . राजकारणी पाच वर्षात स्वतःसाठी पेंशन आणि जे कर्मचारी आपले आयूष्य वाहुन घेतात त्यांना मात्र ठेंगा . खरच लोकशाही आहे का ?
Give to all old pension scheme of primary teacher
एकच मिशन जुनी पेन्शन
Oldpension
Very nice
Restore old pension
आयुष्यभर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही. मात्र अब्जाधीश असलेल्या आमदार, खासदारांना पेन्शन आहे. हा कुठला न्याय आहे ??? पेन्शन ही म्हातारपणाची आधार काठी आहे त्यामुळे सर्व कर्मचऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे !!!
एकच मिशन जुनी पेन्शन
म्हातारपणी स्वाभिमानाने जगण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.
Only old pension one nation one rules
Lipik
Restore old pension
RestoreOldPension
म्हातारपणी स्वाभिमानाने जगण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.
One nation one rule.
Old pension is the best pension scheme for living life with self respect.
एकच मिशन जुनी पेन्शन.
औषध उपचारासाठी पेन्शन पाहिजे
राजकारणीची पेंशन चालूच आहे आणि कर्मचाऱ्याची पेंशन बंद केली. हा कोणता न्याय. शिक्षक आमदार पण काहीच कामी नाही
एकच मिशन, जुनी पेन्शन
पेन्शन हा आमचा हक्क आहे तो आम्हाला पाहिजेच
एकच मिशन जुनी पेंशन
एकच मिशन जुनी पेन्शन
जर आपल्या प्रत्येक NPS ग्रस्त बांधवानी किमान 50 tweets केल्या असत्या तर 20 लाखांच्या वर आपल्या tweets झाल्या असत्या. आपले काही बांधव झोपले आहेत आणि काही झोपेचे सोंग घेत आहेत