फेसबूक लाईव्ह : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे



|मुंबई | कोरोना विषाणू सोबत चालू असलेला लढा आणि या लढ्यातील सेनापती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रवासियांशी संवाद साधला. राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी आपण यासाठी तयारी केली आहे. काही लोक यातही राजकारण करत आहेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही. घाणेरडे राजकारण करत आहेत ते त्यांना करु द्या. मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावर सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. सत्ता येते जाते, पण जीव गेला तर परत येत नाही, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संवादातील मुद्दे :- 

१. करोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध जिंकेल..

२. या संकटाकडं पूर्णपणे दुर्लक्ष न करता आपलं आयुष्य पूर्वपदावर कसं आणता येईल हे आपल्याला पाहायचं आहे..

३. मला कुठल्याही राज्याशी तुलना करायची नाही. पण आपण महाराष्ट्रात १ लाख ८ हजार चाचण्या केल्या आहेत..

४. रुग्णांची संख्या वाढल्यास त्यासाठी सरकारनं काय तयारी केली आहे याचीही मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

५. लक्षणं दिसल्याबरोबर फिव्हर क्लिनिकमध्ये जा. दुर्लक्ष करू नका. अंगावर काढू नका..

६. ग्रामीण भागात आपण काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा दिलीय. त्याचा रिपोर्ट रोज माझ्याकडं येतोय. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. त्यानुसार ३ मे नंतर लॉकडाऊनचं काय करायचं त्याचा निर्णय घेऊ..

७. २० टक्के लोकांमध्ये मध्यम, गंभीर आणि अतिगंभीर लक्षण दिसताहेत. ती देखील दिसता कामा नयेत..

८. हा संयमाचा खेळ आहे. त्यामुळं गाफील राहून चालणार नाही..

९. येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपतोय. २० एप्रिलपासून आपण हातपाय हलवायला सुरुवात केलीय. पण मुंबईत मुभा दिल्यानंतर पुन्हा वर्दळ वाढली. हे होता कामा नये..

१०. राज्यातील परिस्थितीचं त्रयस्थपणे निरीक्षण करा. आम्ही कुठं कमी पडतोय ते सांगा, अशी विनंती आम्ही केंद्रीय पथकाला केलीय..

११. आकड्यांबाबत आम्ही काहीही लपवलेलं नाही. लपवण्यासारखं काहीच नाही. खुद्द केंद्राचं पथक आपल्या राज्यात मुक्काम ठोकून आहे ..

१२. पुन्हा गर्दी झाली तर आतापर्यंतची आपली तपश्चर्या आहे ती व्यर्थ जाईल..

१३. ट्रेन सुरू होणार नाही. आपल्याला गर्दी करता येणार नाही. महाराष्ट्राचे विद्यार्थी इतरत्र आहेत. त्यांनाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत ..

१४. महाराष्ट्रात असलेल्या मजुरांना त्यांच्या घरी कसं पाठवता येईल यासाठी चर्चा सुरू आहे..

१५. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण न करण्याचं आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले त्यांचे आभार

१६. केंद्र व राज्य सरकारमध्ये एकोपा असताना काही लोका राजकारण करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांना तो करू द्या..

१७. सत्ता येईल, जाईल. पण जीव गेला तर पुन्हा येणार नाही..

१८. जिथं कुठं लसीवर संशोधन सुरू आहे. तिथं आपला सतत संपर्क आहे..

१९. आपण कुठंही कमी पडत नाही आहोत. सरकार म्हणून जे करता येईल ते सर्व करतो आहोत..

२०. लॉकडाऊनमुळं करोनाच्या विषाणूचा गुणाकार रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत..

२१. करोनामुळं मृत्यू झालेले पोलीस आपल्यासाठी शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारे मदत केली जाईल..

२२. आज सर्व देवळं बंद असताना देव कुठं आहे? तर, देव आता आपल्यात आहे. डॉक्टरांमध्ये, पोलिसांमध्ये, सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आहे..

२३. आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मीयांचे आभार..

२४. हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *