| मुंबई | परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे देशात कोरोनचा प्रसार झाला. यासाठी सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मोदींविरोधात 302 चा गुन्हा दाखल करावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तसेच लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे. गरीब आणखी गरीब होतील.
ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अशा ठिकाणीही लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांच्या टॅक्समधून येणारा पैसा हा ग्रामीण भागात वापरायचा असतो. प्रत्येक मजुराला काम मिळाले पाहिजे. १० हजार कोटींची गंगाजळ ही टॅक्समधून ग्रामीण भागासाठी येते. ते पैसे वापरण्यात आले पाहिजेत. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री