| मुंबई |कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन आहे आणि कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता अजुन काही काळ लॉक डाऊन उठण्याची चिन्हे देखील नाहीत..! विद्यार्थ्यांच्या बाबतीत अजूनही काही शैक्षणिक गोष्टी मार्गे लावण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रथम सत्राचे गुण ग्राह्य धरत थेट पुढच्या वर्षात बढती दिली आहे. हे सगळे लक्षात घेऊन युजीसीनेही अशाच प्रकारची शिफारस केली आहे.
कॅरी फॉर्वर्डच्या नावाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षांत बढती देण्यात यावी मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेण्यात यावी असे युजीसीने सुचविले आहे. तसेच नव्या सत्राची सुरुवात कधी करायची हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठांना दिले जाऊ शकतात.
शिफारस देत असताना इतरही मुद्दे युजीसीने मांडले आहेत..
१. वार्षिक परीक्षेचा कालावधी तीन तासांऐवजी दोन तासांचा करण्यात यावा.
२. ५० टक्के गुणांचीच वार्षिक परीक्षा घेण्यात यावी
३. ५० टक्के गुण आधीच्या सेमिस्टर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे देण्यात यावेत.
४. त्याचबरोबर २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावा. अशी शिफारसही या समितीने केली आहे.
Hi