लॉकडाऊनच्या काळात पालघर मधील शाळेने राबविला हा अनोखा उपक्रम..!


पालघर : कोरोना व्हायरसने पूर्ण जगाला हादरून सोडल आहे. खबरदारीची उपाय म्हणून आपल्या भारतामध्येही शाळांना आधीपासूनच सुट्टी दिली आहे, परंतु शाळेच्या अंगणात मुक्तपणे संचार करणाऱ्या या मुलांना आजारांपासून संरक्षित ठेवण्यासाठी घरातील मोठे त्यांना घराबाहेरही जाऊ देत नाहीत, त्यांचे बाहेर खेळणेही बंद, मित्रांशी बोलणे बंद म्हणून ती कंटाळली असतील.

त्यावर मार्ग म्हणून पालघर जिल्ह्य़ाच्या शिक्षणाधिकारी लता सानप मॅडम यांनी एका व्हॉट्सअॅप मेसेजमधून जिल्ह्यातील शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रुपी सल्ला दिला यात घरात टीव्हीवरील बातम्या ऐकण्याची सवय, वर्तमानपत्र वाचण्याची सवय, आपल्या आवडी निवडी जपण्याबाबत ही त्यांनी सांगितले. तसेच यासाठी त्यांनी शिक्षकांना व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे विद्यार्थी व पालकांना उद्बोधन करण्याचे सुचवले.

याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषद शाळा कुडूस तालुका वाडा जिल्हा पालघर येथील मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना अविनाश चौधरी यांनी माझी शाळा हा व्हॉट्सअप ग्रुप शिक्षक व विद्यार्थी पालक यांचा तयार करून याद्वारे मार्गदर्शन केेले. अनेक विद्यार्थी पालकांना, शाळेतील शिक्षकांना या ग्रुपमध्ये त्यांनी जॉइन केले. या ग्रुपच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक विविध अॅपच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. आवश्यक ई लर्निंग साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.. त्यातून  इयत्ता चौथीत शिकत असलेला भार्गव निलेश अधिकारी या विद्यार्थ्यांने स्वतःची कल्पकता व चित्रकलेची आवड या माध्यमातून सर्व विद्यार्थी व पालक यांना कोरोना व्हायरस बाबत जागृत करण्यासाठी चित्रे काढली ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहेत. भार्गव आर्ट्स या नावाने तो चित्रे काढून त्यातून कोरोनाबाबत जागृतीचे संदेश देण्याचे काम करतो. यात शाळेतील शिक्षकांबरोबरच त्याला त्याचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री निलेश अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

त्यामुळे या लॉक डाऊनच्या काळात मिळणाऱ्या फावल्या वेळात आपल्या मुलांसमवेत सर्व पालकांनी वेळ घालवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रेरित होण्यासाठी प्रयत्न करावा. याउपक्रम राबवणाऱ्या विद्यार्थ्यांचे , पालकांचे , शाळेतील मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक श्री.पवन कानडे यांचे कौतुक वाडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत खोत सर त्याप्रमाणे मार्गदर्शक विस्तार अधिकारी श्री बाराते सर व केंद्रप्रमुख श्री कैलास सोनवणे सर यांनी मेसेजद्वारे शुभेच्छा देऊन केले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *