| मुंबई | शहारातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा प्रशासनानं कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या खाटा मिळत नसल्याबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या. तसंच, खासगी रुग्णालयांकडून जास्त दर आकारले जात होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासगी रुग्णालयांतील खाटांचे वितरण हे रुग्णांना अधिक प्रभावीपणे व्हावं, तसंच रुग्णालयांची व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक व्हावी याकरिता सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासगी रूग्णालयांमध्ये निर्धारित दर आकारणी व्हावी, तसेच देयक विषयक तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी रुग्णालय विषयक तक्रार करण्यासाठी ‘ई-मेल’द्वारे सनदी अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारीचा पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.(BMC team for covid19)
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कोविड कोरोना १९’ ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, याकरिता राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा या महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयन देखील महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. तसेच या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी सदर रुग्णालयाद्वारे केली जात आहे.
खासगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात; याकरिता सुयोग्य समन्वय साधण्यासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाचे दायित्व देखील सोपविण्यात आले होते.
एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे. वरील तपशिलानुसार ५ सनदी अधिकाऱ्यांची नावे, त्यांच्याकडे दायित्व देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयाचे नाव आणि काही तक्रार किंवा सूचना असल्यास; ती पाठविण्यासाठी संबंधित सनदी अधिकाऱ्यांचा ‘ईमेल आयडी’ पुढीलप्रमाणे आहे :१ . मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, कॉनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास श्री. नागरगोजे यांचा ईमेल पत्ता पुढीलप्रमाणे आहे:
covid19nodal1@mcgm.gov.in
२. अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी डी हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे. पाटील यांचा ईमेल पत्ता :
covid19nodal2@mcgm.gov.in
३. राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ई-मेल :-
covid19nodal5@mcgm.gov.in
४. सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एस आर व्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ई-मेल : covid19nodal4@mcgm.gov.in
५. प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांविषयी काही तक्रार किंवा सुचना करावयाची असल्यास त्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे आहे :-
covid19nodal3@mcgm.gov.in
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .