| मुंबई | मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नाव नोंदवायचे आहे.
दरम्यान, पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. पहिली प्रवेश यादी ४ऑगस्टला जाहीर केली जाईल.
तसेच ८ जुलैपासून विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास ०२०- ६६८३४८२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना हमीपत्र फॉर्म भरुन कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमिपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाईल.
प्रवेशाचे वेळापत्रक
अर्ज विक्री : २४ जुलै ते ४ ऑगस्ट
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया : २३ जुलै ते ४ ऑगस्ट
प्रवेश अर्ज सादर करणे : २७ जुलै ते ४ ऑगस्ट
पहिली गुणवत्ता यादी : ४ ऑगस्ट
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : ५ ते १० ऑगस्ट
दुसरी गुणवत्ता यादी : १० ऑगस्ट
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : ११ ते १७ ऑगस्ट
तिसरी गुणवत्ता यादी : १७ ऑगस्ट
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : १८ ते २१ ऑगस्ट
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration २०२०-२१) या लिंकवर क्लिक करावे, लागणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .