- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन
मुंबई / क्रीडा प्रतिनिधी : देशात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही धोका निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी सांगितले की सध्या आयपीएल पुढे ढकलण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात येणार आहे.
As the lockdown has been extended till May 3 by the government, we will postpone the Indian Premier League for the time being: BCCI Sources pic.twitter.com/VzRpTlVa9M
— ANI (@ANI) April 14, 2020
यापूर्वी आयपीएल २९ मार्चपासून आयोजित करण्यात येणार होती, मात्र देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १४ एप्रिलपर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्यात आला होता. त्यादरम्यान विमानसेवा रद्द करण्यात आल्यानंतर परदेशी खेळाडूंना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता आयपीएलला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.