कोरोना सोबत किटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेला सुरुवात..

| जळगाव | गेल्या काही दिवसापासुन कोरोनामुळे सारे जग हतबल असुन कोरोनाचा समुळ नायनाट व्हावा म्हणुन आरोग्य विभागासह सर्व विभाग प्रयत्न करीत आहे. कोरोनाचे संकट असतांना आता पावसाळा सुरु होत आहे. पावसाळ्यात किटकजन्य व जलजन्य आजार आपली डोकी वर काढतात. दरवर्षी आरोग्य विभागामार्फत जुन महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. कोरोनाच्या गडबडीतही आरोग्य विभाग किटकजन्य व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सज्ज झालेला आहे. जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.दिलीप पाटोळे व जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.सुचिता आकडे, प्राथमिक आरोग्य केंद्र कजगावचे वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील व डाँ.स्वप्निल पाटील व पाचोरा-भडगावचे हिवताप पर्यवेक्षक गजानन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडगाव येथे हिवताप प्रतिरोध दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे नियोजन गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले. सदर प्रसंगी अधिक माहिती देतांना सोनार यांनी सांगितले की पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगांमध्ये प्रामुख्याने हिवताप, डेंग्यु, चिकनगुनीया हे असतात. हे सर्व आजार डासांमुळे होतात. म्हणुन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कंटेनर्स सव्हेक्षण करण्यात येते. तसेच ग्रामपंचायतीस आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळाण्या संदर्भात सुचना दिल्या जातात. गटारी वाहत्या करणे, परिसरात पावसाच्या पाण्यामुळे साचणाऱ्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडणे किंवा त्यात खराब आँईल टाकणे, पाण्यांच्या टाक्यांवर घट्ट झाकण ठेवणे. अशा प्रकारे हिवताप प्रतिरोध महिन्याची जनजागृती केली जाणार आहे. सदरप्रसंगी गोंडगाव येथील आरोग्यसेविका शोभा मोरे, गटप्रवर्तक सुनंदा कोतकर, वर्षा भांडारकर, आशा स्वयंसेविका आशा भोसले, ज्योती मराठे, गीता मोरे, जयश्री गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *