| पारनेर | निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशन च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ‘ ऑनलाईन शाळा ‘ या अँप्लिकेशनची माहिती संदीप गुंड यांनी ग्रामविकास मंत्र्यांना दिली. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले असून सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, पारनेर शहराध्यक्ष कविता औटी, पंचायत समितीचे उपसभापती सुरेश धुरपते, सरपंच अॅड. राहुल झावरे, जयसिंंग मापारी, अरूण पवार, बापूसाहेब शिर्के, ठकाराम लंके, दत्ता कोरडे आदी उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .