| मुंबई | ‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी रजा अकादमी या संस्थेने राज्याच्या सायबर विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असे पत्र केंद्र शासनास पाठविले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सदर चित्रपटाचे प्रसारण २१ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, परंतु त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते. त्यास अनुसरून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालावी तसेच यु ट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात केली आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने देखील अशा प्रकारची विनंती सदर मंत्रालयाला केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची माहिती श्री.देशमुख यांनी दिली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .