लॉक डाऊन १४ एप्रिलला संपणार…?


मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजना या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्य माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. लॉकडाउनचा काळ संपला म्हणजे सगळं काही संपलं असं नसून ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी अधोरेखित केलं. तसंच ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत असंही सांगितलं.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या सूचना ..

  •  लॉकडाऊन संपवल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पहावे.
  •  देशात आत्तापर्यंत आपण करोनाला रोखण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे सगळे संपले असं नाही. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
  • करोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वैगेरे तंत्रज्ञनाचा उपयोग करा.
  • करोनाचामुकाबला हा फक्त डॉक्टर करत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.
  • निवृत्तअधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ, यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.
  • सवंगलोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळेल पण करोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.
  • आताअनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल. यावेळी ग्रामीण भागात गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.
  • पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.
  • ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.
  • आयुष्यमंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहेत. आपणही काळजी घेतली पाहिजे पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *