- मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात ठाणे येथील पत्रकार, कॅमेरामन देखील आल्याने त्यांनादेखील क्वॉरंटाईन होण्यास सांगितले आहे.
माहितीनुसार, मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच पूर्वकाळजी म्हणून क्वॉरंटाईन होण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसंच एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. यामुळे त्यांनाही होम क्वॉरंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन केलं आहे.
Khup vait news aali ……lokansathi divas ratra ek karnara neta …lavkar bara zala pahije