आमदार विक्रम काळे यांचे आवाहन
औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्यात यावे अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.आमदार काळे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली असून त्यामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये शिल्लक असलेले शालेय पोषण आहार संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटप करण्यासाठी परवानगी देण्याची मागणीही केली आहे.शासनाने जाहीर केलेला २० टक्के व ४० टक्के वेतन अनुदान वितरणाचा आदेश काढण्यासाठी सोमवारी सकाळी ७.२५ वा. आपण ना. अर्थमंत्री अजित पवार व ना.शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला आहे.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात अधिकारी नसल्याने अधिकारी आल्यावरच तो निर्णय होईल. संबंधित निधी अजिबात लॕप्स होणार नसल्याचे ना.पवार यांनी सांगितले.
त्याचबरोबर भाजप सरकारने रँडम तपासणीसाठी टाकलेली जाचक अट काढून टाकण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना शिक्षणमंञी यांना केल्याचे ना.पवार यांनी आपल्याला भ्रमणध्वनीवरुन बोलताना सांगितल्याचे आमदार काळे यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.