| कल्याण | कोरोना महामारीच्या काळात सरकारने टाळेबंदी जाहीर केली होती. मागील ३ महिन्यात महावितरणच्या ग्राहकांना सरासरी विद्युत देयकाची रक्कम असलेली बिलं येत होती, मात्र आता महावितरणने ग्राहकांना भरमसाठ रक्कम असलेली विद्युत देयके पाठवून सर्वसामान्य ग्राहकांच्या नाका- तोंडाला फेस आणला आहे. ग्राहकांना येणाऱ्या भरमसाठ बिला संदर्भात अनेक नागरिकांनी मनसे सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर यांच्याकडे धाव घेतली व आपली कैफियत मांडली. शासनाने टाळेबंदी जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कार्यालयात जाता आले नाही तसेच कोणताही कामधंदा करू शकले, परिणामी अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली, अशातच महावितरणने बिलाची रक्कम भरमसाठ पाठवून ग्राहकांना शॉक दिला आहे.
महावितरणच्या या शॉकच्या मनमानी कारभारा विरोधात मनसेने जोर का झटका देत कार्यालयावर धडक देऊन वीज बिल कमी करण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. महावितरणने आपला कारभार असाच मनमानी सुरू ठेऊन ग्राहकांची पिळवणूक केली तर मनसे यापेक्षाही मोठे आंदोलन हाती घेईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाशी बोलताना कार्यकारी अभियंता राठोड व कट्टा यांनी ग्राहकांना चुकीची व वाढीव वीज बिल गेल्याने त्यामध्ये दुरुस्ती करून देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.
या शिष्टमंडळामध्ये मनसे सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक पवन भोसले, माथाडी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस राजन शितोळे, विध्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केणे, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईट, जिल्हाध्यक्षा स्वाती कदम,नयना भोईर, जिल्हा सचिव वासंती जाधव, शहर अध्यक्षा शीतल विखणकर, नगरसेविका तृप्ती भोईर, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .