लॉक डाऊन काळात होत आहे हे सर्वाधिक सर्च..!
VPN वापरणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले..!


  • लॉकडाऊनमध्ये भारतीय लोक प्रतिदिन १५० मिनिटांवरून २८० मिनिटं इंटरनेटचा वापर करत असल्याचं दिसून आलं.

मुंबई / प्रतिनिधी :  कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशच नाही तर जग सुद्धा ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व लोक घरी असल्यानं सध्या भारतात इंटरनेटचा वापर वाढला आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतातीय लोक लॉकडाऊनपूर्वी प्रतिदिन १५० मिनिटं इंटरनेट वापरत होते. मात्र लॉकडाऊननंतर यात लक्षणीय वाढ झाली. लॉकडाऊनमध्ये भारतीय लोक प्रतिदिन २८० मिनिटं इंटरनेटचा वापर करत असल्याचं दिसून आलं. तसेेच लॉकडाऊनमुळे अनेकजण वर्कफ्रॉम होम आहेत. ज्यामुळे VPN चा वापर १५ % वाढला आहे.

सध्या भारतीय लोक मोबाईलवर जास्त अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करत असल्याच या सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी सर्वाधिक कॉमिक आणि वाचनाशी संबंधीत अ‍ॅप्स डाउनलोड केल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याशिवाय अडल्ट साइट सर्च करण्याच प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढल्याचं सुद्धा दिसून आलं आहे. या व्यतिरिक्त लूडो किंग, टिकटॉक, जूम, व्हाट्सअ‍ॅप आणि UVIDEO यासारखी अ‍ॅप्स भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर डाउनलोड केल्याचं दिसून आलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *