| मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक राजकीय नेते आणि मंत्री देखील प्रत्यक्ष काम करत असल्याने कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. काँग्रेस आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून त्यांनी स्वतःला घरातच आयसोलेट केले आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. अस्लम शेख यांनी कोरोना काळात मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत.
“मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला आयसोलेट करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंती देखील अस्लम शेख यांनी केली. “मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.” असेही अस्लम शेख यांनी सांगितले.
यापूर्वी राज्यातील अनेक नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. या तिन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .