| वसई विरार | वसई विरार महापालिकेवर आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. २८ जून रोजी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव, वसई विरार नालासोपारा शहरात दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती याचे नियोजन करताना प्रशासक गंगाथरण डी यांची कसोटी लागणार आहे.
११५ सदस्य संख्येच्या वसई विरार महापालिकेत १०९ नगरसेवक असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. मात्र या महापालिकेचा गाडा पहिल्यांदाच प्रशासक हाकणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून महापालिकेत आयुक्त आणि लोकप्रतिनिधीमध्ये खटके उडत होते. त्यामुळे प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी प्रशासनाला किती सहकार्य करणार, हा प्रश्नचिन्ह आहे.
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची नुकतीच बदली झाली होती. खुद्द मनाळे यांची विनंती आणि प्रशासकीय कारणावरुन बदली झाल्याची चर्चा आहे. वसई विरारमध्ये ‘कोरोना’चे संकट वाढत असताना जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीने महापालिका कामाच्या नियोजनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रमेश मनाळे यांना गेल्या दोन वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता.
वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. त्यामुळे कोरोना संकटात प्रशासकीय अडथळे येण्याची भीती वर्तवली जात आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .