| नागपूर | नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे लेखी तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भातल पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांनी सीईओ पद बळकावल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात केंद्र सरकारला हे पत्र लिहिलं आहे. ज्यात ते म्हणतात, “नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपदही त्यांनी बळकावलं आहे” या आशयाचा मजकूर या पत्रात आहे.
नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला तेव्हाच त्यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाची जबाबदारी बेकायदा बळकावली असा आरोप गडकरींनी केला आहे. निविदा रद्द करणे, कोरोनाच्या काळात कंत्राटी कामगारांचे काम थांबवणे असे निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतल्याचंही या पत्रात गडकरींनी नमूद केलं आहे.
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंढे यांनी स्मार्ट सिटी मध्ये २० कोटींचा घोटाळा केला असाही गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिलं असाही आरोप त्यांनी केला होता. त्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .