| मुंबई | भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध बिघडलेले असल्याचे सध्या दिसतेय. दरम्यान नेबाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतातील सांस्कृतिक वारशाविषयी वादग्रस्त विधान करण्यास सुरूवात केली आहे. भारतात पुजनीय असलेल्या भगवान श्रीरामांविषयी विधान केले आहे. ते म्हणाले होते की, भगवान राम हे नेपाळी होते, तसेच भारतातील अयोध्या ही नकली आहे. तर खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा दावा त्यांनी केली होता. आता नेपाळच्या पंतप्रधानांवर शिवसेनेने टीकास्त्र साधले आहे. चीनची ‘रखेल’ असल्याप्रमाणेच ओली यांचे वर्तन असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तर यांचे रामासंदर्भात विधान फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे, हिंदुस्थानातील अयोध्या खोटी, असा दावा नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी केला. हा दावा विनोदी आहे. नेपाळचे पंतप्रधान हे सरळसरळ चीनचे हस्तक आहेत. चीन नेपाळच्या माध्यमातून हिंदुस्थानात धार्मिक अस्वस्थता पसरवीत आहे. राम जन्मला कोठे, हा वाद नेपाळ निर्माण करतोय. रामाची सीता कोण, असे विचारण्याचाच हा प्रकार! असल्याचे म्हणत शिवसेनेने त्यांच्यावर घणाघात केला आहे.
सामना अग्रलेखात नेमके काय?
• नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा हे काही दखलपात्र राजकारणी नाहीत. पण त्यांच्या हिंदुस्थानविरोधी वक्तव्यांमुळे ते नेपाळ आणि हिंदुस्थानात चर्चेत आले. आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ‘हिंदुस्थानात जी अयोध्यानगरी आहे ती नकली आहे. खरी अयोध्या नेपाळात आहे व राम हा नेपाळी आहे.’ ओली यांचे विधान फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण देशाची संस्कृती व श्रद्धा हिंदुत्वाशी निगडित आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी रामासंदर्भात असे वक्तव्य करावे याचे आश्चर्य वाटते.
• ओली हे हिंदू असले तरी चीनचे हस्तक आहेत. चीनची ‘रखेल’ असल्याप्रमाणेच ओली यांचे वर्तन आहे. ओली यांनीच नेपाळच्या पंतप्रधानपदी राहावे यासाठी चीन नेपाळमध्ये राजकारणी व खासदारांना प्रचंड पैसा देत आहे. खुद्द ओली यांच्या परदेशी बँक खात्यात चीनकडून ४५ कोटी रुपये जमा झाल्याचे पुरावे समोर आले. अशा ओलींनी हिंदुस्थान विरोधात भूमिका घेणे स्वाभाविक पण आज त्यांनी श्रीराम हे ‘नेपाळी’ असा शोध लावून धमाल उडवली.
• सीतेची पाऊले अयोध्येतील अनेक वास्तूंत उमटली. त्या श्रद्धा येथे आजही कायम आहेत. नेपाळमधून सीता अयोध्येत आली व ज्या महालात वरात उतरली तो सीता महल आजही अयोध्येत आहे. चीनचे हस्तक असलेले ओली या श्रद्धेच्या खुणा कशा पुसणार?
• वाल्मीकी आश्रम रामायण वाल्मीकीने लिहिले. राम हा आजही ईश्वरी अंश मानला जातो. पण जगभरात आज ३०० हून जास्त रामायण ग्रंथ लिहिले व प्रत्येक ग्रंथात वेगवेगळ्या कथा व मान्यता आहेत. वेद रामायण आणि पुराणात अयोध्येचा स्पष्ट संदर्भ आहे. त्यानुसार जेथे शरयू आहे तेथेच अयोध्या आहे. संपूर्ण भू-मंडलावर राजे असायचे आणि सर्वांचे चक्रवती सम्राट हिंदुस्थानच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येचे महाराज असायचे, असे रामदास ट्रस्टचे प्रमुख रामदास महाराज यांनी सांगितले. हे ओली यांना माहीत नसावे.
• राम व राममंदिर हा हिंदुस्थानसाठी भावनेचा तितकाच श्रद्धेचा विषय आहे. एखादा भावनात्मक विषय राजकारणासाठी घेतला जातो तेव्हा त्याच्या प्रचारात अतिशयोक्ती कशी जास्त शिरते, याचा राम जन्मभूमी हा विषय म्हणजे उत्तम नमुना आहे. आधी अयोध्येत राम जन्मलाच नाही असा दावा झाला व आता जेथे राम जन्मला ती ही अयोध्याच नाही, असे सांगितले गेले. या दोन्हीमागे पाकिस्तान व चीनसारखी राष्ट्रे आहेत.
• राम अयोध्येत जन्मला ही श्रद्धा खरी आहे. त्याचे पुरावे कोणी मागू नयेत. गेल्या दोनशे वर्षांतील मान्यवर ठरलेल्या व्यक्तीचे जन्म कुठे झाले हे सांगता येत नाहीत तेथे रामाचा जन्म येथेच झाला व ते गाव नेपाळमध्येच आहे असा दावा एका राष्ट्राचे पंतप्रधान कसा करू शकतात? १५२८ मध्ये बाबराचा एक सेनापती मीरबांकी याने दशरथ महाल व अयोध्येतील मंदिरे तोफा लावून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या काही तोफांना वात लावून चीनचे एजंट ओली यांना धक्का द्यावा लागेल.
• सीतामाईचे माहेर नेपाळात आहे. रामाची पाऊले त्या भूमीवर उमटली म्हणून ते पहिले हिंदुराष्ट्र ठरले. पण जेथे राम जन्मला ती अयोध्या व हिंदुस्थान मात्र धर्मनिरपेक्ष बनले. आज नेपाळवरही चीनच्या लालभाईने झडप मारली व ते हिंदुराष्ट्र संपवले. ओलीसारखे लोक तेथे असल्यावर दुसरे काय व्हायचे!
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .