
| नवी दिल्ली | चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर सोशआर्ट डिया वापरासाठी भारतात स्वदेशी अॅपची मोहिम सुरु झाली आहे. या अंतर्गत भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. जवळपास १००० पेक्षा अधिक आयटी तज्ज्ञ हे स्वदेशी अॅप तयार करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने एक भारतीय सोशल मीडिया सुपर अॅप ‘इलायमेंट्स’ तयार केले आहे .
या अॅपला तयार करताना अनेक आय तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. इतर वेगवेगळ्या सोशल मीडिया अॅपमध्ये जे सर्व फिचर्स आहेत ती सर्व या एकाच अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, असंही बोललं जात आहे. यात सोशल कनेक्टिव्हिटीसोबत चॅटिंग, ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग, ई-पेमेंट, ई-कॉमर्ससारखे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे अॅप ८ भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रायव्हसी एक्सपर्ट्सच्या मदतीने यूजर्सच्या डाटाची पूर्ण सुरक्षितता पाळण्यात आली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगने या अॅपमध्ये वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. अनेक महिने सातत्याने अॅपची चाचणी घेण्यात आली आहे. यासाठी वापरकर्त्यांची सर्व माहिती देशातच ठेवण्यात येणार आहे. इतर कुणीही तिसरी व्यक्ती ही माहिती चोरी शकणार नाही, असाही दावा करण्यात आला आहे. सध्या हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत जवळपास १ लाख जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या पहिल्या स्वदेशी सोशल मीडिया अॅपचं लाँचिंग केलं. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर देखील उपस्थित होते.
दरम्यान, भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. देशात जवळपास ५० कोटीपेक्षा अधिक सोशल मीडिया यूजर्स आहेत. यामधील सर्वात जास्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारताबाहेरील आहेत. आता परदेशी कंपन्यांवर माहिती चोरीचे गंभीर आरोप झाल्यानंतर स्वदेशी अॅपही बाजारात येत आहेत.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री