
| मुंबई | भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पक्षामध्ये साईडलाईनला गेलेल्या नेत्यांचं भाजपने पुनर्वसन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले नाराज चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस हे पद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे. तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
अशी आहे भाजपची कार्यकारिणी :
सरचिटणीस – चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, सुजितसिंह ठाकुर, रवींद्र चव्हाण
उपाध्यक्ष – राम शिंदे, संजय कुटे, माधव भंडारी, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, जयकुमार रावल, कपिल पाटील, भारती पवार
प्रदेश कार्यकारिणी सदस्य (विशेष निमंत्रित)- विनोद तावडे, एकनाथ खडसे, नारायण राणे, गणेश नाईक, प्रकाश मेहता
प्रदेश कार्यसमिती सदस्य- मेधा कुलकर्णी
विधानसभा मुख्य प्रतोद- आशिष शेलार
विधानसभा प्रतोद- माधुरी मिसाळ
किसान मोर्चा अध्यक्ष- अनिल बोंडे
कोषाध्यक्ष पदावर शायना एन सी यांच्याऐवजी मिहीर कोटेजा यांची नियुक्ती
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री