छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ९ मे ला रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
अजित जोगी यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड इथे सामान्य कुटुंबात २९ एप्रिल १९४६ रोजी झाला होता. अजित जोगी लहानपापासूनच प्रतिभावान होते, ते अभ्यासात नेहमीच अग्रेसर असायचे. १९६८ मध्ये त्यांनी मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी, भोपाळकडून मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवून अभ्यासक्रम पूर्ण केला होता. महाविद्यालयीन दिवसात जोगी यांची आपल्या विभागातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील निवड झाली होती. त्यासोबत प्रशासन अभियंता महाविद्यालय, रायपूर (छत्तीसगड) येथे ते प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होते.
राजकारणी नंतर आधी प्रशासकीय यंत्रणेत देखील ते उच्च पदस्थच होते. १९७४ मध्ये अजित जोगी यांची भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) निवड झाली. ते १९७४ ते १९८६ पर्यंत मध्य प्रदेशातील सिधी, शाहडोल, रायपुर आणि इंदौर जिल्ह्यांमध्ये १२ वर्षे सेवा करुन सर्वात जास्त काळ सेवा देणारे कलेक्टर म्हणून ऑफिसमध्ये रेकॉर्ड आहे.त्यांची राजकीय प्रवासाची सुरवात १९८८ साली काँग्रेसमध्ये प्रवेश करून झाली. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी २०००- २००३या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. ते छत्तीसगडचे पाहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. नक्षलवादी हल्ल्यातून देखील ते वाचले होते.
दरम्यान, २०१६ मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. देशातील प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या व्यक्तींमध्ये अजित जोगी यांचे नाव घेतले जाते. छत्तीसगडमध्ये मारवाही विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री
💐💐💐विनम्र अभिवादन 💐🙏