रुपाली चाकणकर यांची टीका..!
पुणे : संपूर्ण देश करोना विरूद्ध लढत असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे, तशी अपेक्षा पंतप्रधान यांच्याकडून आहे. परंतु जनतेच्या वेदना त्यांची आर्थिक चिंता, कोरोना विषाणू सारखे भयंकर संकट दुर कसे होईल यावर पंतप्रधान महोदय काहीच बोलत नाहीत. वैद्यकीय उपाययोजना, लॉकडाऊन नंतरच्या काय उपाययोजना याविषयी बोलायचं सोडून फक्त शो बाजी करत आहेत.
सामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा असताना आपण काय मदत देणार आहात यावर बोलायचं सोडून काहीतरी आव्हान करायचं, येणाऱ्या ५ एप्रिलला दिवे पेटवून सामान्यांच्या पोटाची खळगी भरणार नाही. त्यापेक्षा व्हेंटिलेटरवर लागणारा १२ टक्के जीएसटी कमी करून कोरोना बाधित पेशंटला दिलासा द्यावा, असे देेेखील रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. ट्विट करत त्यांनी मोदींवर टीका केली आहे.
सध्या सोशल मीडियातून देखील मोदींच्या निर्णयावर प्रचंड टीका होत आहे.