| मुंबई | बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत. काल आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनाही लागण होण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई पोलीस खात्यातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील हळहळ व्यक्त केली होती. तसेच कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे आयुक्तांनी संबंधित निर्णय घेतला आहे. याला अनुसरून मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी ५५ पेक्षा अधिक वय असलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे आदेश दिले आहे.