स्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे

सय्यद तौसिफ स्वराज्य मंडळाचे नेते तथा उर्दू विभागाच्या सर्वेसर्वा पदी..

अहमदनगर शिक्षक परिषदेला सुरुंग, नेते बाबुराव कदम यांची स्वराज्य मंडळाच्या उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी निवड

| अहमदनगर | नुकतीच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा बैठक पार पडली. या मिटींगमध्ये अनेक खलबते होत विविध विषयांवर ठराव पारित झाले. त्यापैकी स्वराज्य मंडळ कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध असून, येत्या निवडणुकीत शिक्षक बँकेच्या व विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याचा ठराव पारित करण्यात आला. जिल्हा कार्यकारणी तथा तालुका कार्यकारणी यांना ब्लू प्रिंट देऊन पुढील कामाला लागण्यासाठीचे निर्देश देण्यात आले. त्यात स्वराज्य मंडळाचे नेते ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याकडे जाहीरनामा बनवण्याची जबाबदारी देण्यात आली, तर नेते सय्यद तौसिफ यांच्याकडे उर्दू विभागाचा संपूर्ण कार्यभार सोपविण्यात आला.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव कदम यांनी परिषदेला रामराम करत स्वराज्य मंडळात प्रवेश करताच स्वराज्य मंडळाची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले असताना, सर्वानुमते अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या उच्चाधिकार समिती जिल्हाध्यक्षपदी बाबुराव कदम यांची निवड करण्यात आली.

यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष विनोद देशमुख, श्रीरामपूरचे नेते निलेश राजवाळ, अकोल्याचे जिल्हा नेते प्रशांत गवारी, संगमनेरचे कार्याध्यक्ष अशोक साळवे व संगमनेर विश्वस्त गणेश शेंगाळ, कर्जतचे जिल्हा नेते संतोष हजारे, दीपक बडे, सर्वश्री अमोल साळवे, स्वराज्याचे नेते ज्ञानेश्वर सोनवणे व सय्यद तौसिफ यांनी मनोगते व्यक्त करत स्वराज्याला पुढील दिशा देण्यासंदर्भातील मार्गदर्शन केले.

सभेचे प्रास्ताविक भाऊसाहेब पाचारणे सर यांनी केले. यावेळी प्रतीक नेटके, निलेश राजवाळ, अर्जुन तळपाडे, प्रशांत गवारी, अरुण पठाडे, देविदास फुंदे, भाऊसाहेब पाचारणे, सय्यद तौसिफ, गणेश शेंगाळ, गिरमकर भाऊसाहेब, नितीन भोईटे, ज्ञानेश्वर सोनवणे, राज कदम, अमोल साळवे, नाना गाढवे, विनोद देशमुख, गणपत चव्हाण, दीपक बडे, अशोक जाधव, सतीश पटारे, अरविंद थोरात, सचिन नाबगे, राजेंद्र ठोकळ, प्रवीण झावरे, अशोक साळवे, बाबुराव कदम, सदानंद चव्हाण आणि योगेश थोरात तसेच तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

✓ जिल्हा परिषदेच्या उर्दू शिक्षक मतांवर कुणीही अधिकार सांगू नये, जिल्ह्यातील उर्दू शिक्षक बांधव आमच्या सोबत आहे

– सय्यद तौसिफ, नेते

✓ स्वराज्य मंडळ सर्व जागा स्वबळावर पूर्ण क्षमातेने लढणार असून , बँकेत सभासदांना योग्य पर्याय स्वराज्य माध्यमातून मिळालेला असल्याने सत्तेची चावी स्वराज्य मंडळाकडे आहे.

सचिन नाबगे, जिल्हाध्यक्ष

✓ तरुण बांधवांना न्याय देण्याची मानसिकता कोणत्याही मंडळाची नाही, सर्व काही आपल्याला पाहिजे, या वृत्तीने सर्व प्रस्थापित कार्य करत आहेत. परिणामी तरुण आणि ज्येष्ठ यांच्या विचाराने चालणाऱ्या स्वराज्य मंडळासोबत जाण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.

बाबुराव कदम, उच्चाधिकार समिती

Leave a Reply

Your email address will not be published.