| मुंबई | कोरोना लसीकरणानंतर मिळालेल्या सर्टिफिकेटवर जर आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची असेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही त्यात बदल कर शकता. Cowin वेबसाईट आपल्याला यामध्ये सुधारणा करण्यास परवानगी मिळते. आपण घरी बसून त्यात सुधारणा करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्टिफिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला केवळ एक संधी मिळेल. तुम्ही पुन्हा चुकीचे तपशील भरले तर मात्र त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. आता कोरोना लसीकरण सर्टिफिकेटमध्ये सुधारित करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया.
लसीकरण प्रमाणपत्रात दुरुस्त्या कशा कराल?
✓ यासाठी सर्वात आधी www.cowin.gov.in वेबसाईटवर जा. यानंतर रजिस्टर आणि साईन बटणावर क्लिक करा.
✓ आता आपल्या नोंदणीकृत फोनवर ओटीपी येईल.
✓ अकाउंट डिटेल्स सेक्शनमध्ये Raise an issie वर क्लिक करा.
✓ आता येथे आपण नोंदणीकृत सदस्याचे नाव भरावे लागेल, जे अनिवार्य आहे.
✓ यानंतर सर्टिफिकेट करेक्शनच्या पर्यायावर क्लिक करा आणि Continue वर क्लिक करा.
✓ आता तुम्हाला ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत त्या अचूकपणे करा आणि रजिस्टर रिक्वेस्टसाठी Continue बटणावर क्लिक करा.
✓ नवीन अपडेटेड सर्टिफिकेट तुम्ही डाऊनलोड करुन सेव्ह करु शकता.
✓ पासपोर्टला कोरोना लसीकरण सर्टिफिकेटशी लिंक करा.
• पासपोर्टला कोरोना लसीकरण सर्टिफिकेटशी लिंक करण्यासाठी cowin.gov.in वेबसाइटवर जा.
येथे लॉग इन करा आणि raise an issue पर्याय निवडा.
यानंतर तेथे पासपोर्टचा पर्याय निवडा.
येथे ड्रॉप डाऊन मेन्यूमधील व्यक्ती निवडा.
यानंतर पासपोर्ट क्रमांक एंटर करा.
आता शेवटी सर्व तपशील भरुन सबमिट करा.
असं केल्यानंतर काही वेळात तुमचा पासपोर्ट आणि कोरोना लसीकरण सर्टिफिकेट लिंक होईल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .