| पुणे | एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे आयोजित ‘ एनएमएमएस ‘ शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी येथील इ.८वीच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन करत ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आयोजित महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांची वतीने दरवर्षी इयत्ता आठवी च्या विद्यार्थांसाठी ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा’ ( एनएमएमएस शिष्यवृत्ती) आयोजित करण्यात केली जाते . या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थांना इ.१२ वी पर्यंत दरमहा १०००रु शिष्यवृत्ती रक्कम मिळत असते. या वर्षी ही शिष्यवृत्ती परीक्षा ६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण येथील ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चि.गणेश बाबू निम्मणवाड , कु. योगिता शिवाजी फड, कु. दिव्या पंढरीनाथ उकिरडे हे ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले आहेत.
इ.८वी च्या विद्यार्थांना मुख्याध्यापक श्री.आत्माराम वाघमारे, श्री.रामदास वाव्हळ, सौ. सुनिता बोडके, सौ. प्रिती पंडीत , श्रीम. वर्षा ढेपे यांनी मार्गदर्शन केले.
मुळशी पंचायत समितीचे सभापती श्री. पांडूरंग ओझरकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, गट शिक्षणाधिकारी माणिक बांगर, माणच्या सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच प्रदीप पारखी, ग्रामपंचायत सदस्य रवी बोडके, ग्रामपंचायत समिती सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडीत गवारे, उपाध्यक्ष पांडूरंग महाडीक , केंद्र प्रमुख सुरेश साबळे , ग्रामविकास अधिकारी बी.आर. पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.