| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तरुणपणी रोज रात्री विविध विषयांवर देवी ‘जगत जजनी’ ला उद्देशून लिहिलेली पत्रे पुढील महिन्यात पुस्तकरूपात प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पुस्तक हार्परकोलिन्स इंडिया प्रकाशित करणार असून मूळ गुजराती मध्ये लिहिलेली पत्रे प्रख्यात सिने समीक्षक भावना सोमय्या यांनी इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. या पुस्तकाचे नाव ‘लेटर्स टू मदर’ असे आहे. हे पुस्तक इ-बुक स्वरूपात ही प्रसिद्ध केले जाणार आहे.
ही पत्रे मोदी यांनी १९८६ मध्ये लिहिलेल्या रोजनिशीतून घेतली आहेत. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मोदी म्हणाले, हा काही साहित्यिक लिखाणाचा प्रयत्न नाही. तर त्यामध्ये त्या काळातील माझ्या निरीक्षणांचे प्रतिबिंब आणि जे जाणवले त्या विचारांचा लेखाजोगा आहे.
पुढे ते म्हणाले, मी काही लेखक नाही. आपल्यापैकी अनेक जण तसे नसतातही पण प्रत्येकाला आपल्या मनात भावना व्यक्त करायच्या असतात. माझ्या मनातही अशा भावनांचा कल्लोळ उठला की कागद आणि पेन हाती घेतल्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नसतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ही पत्रे वाचण्यासाठी आणि मोदींचा नवा आयाम शोधण्यासाठी या पुस्तकावर रसिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळू शकते.!
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री