
- टिक-टॉक विरुद्ध युट्यूब या वादामुळे रेटिंग मध्ये कमालीची घसरण झाली होती
| मुंबई | टिक-टॉक आणि युट्यूब इंटरनेटवरील सर्वाधिक लोकप्रिय अॅप म्हणून ओळखले जातात. मनोरंजनासाठी या अॅप्लिकेशनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु गेल्या काही काळात सोशल मीडियावर सुरु झालेल्या टिक-टॉक विरुद्ध युट्यूब या वादामुळे टिक-टॉकच्या रेटिंगमध्ये कमालीची घसरण झाली होती. परंतु गुगलच्या मदतीने टीक-टॉकने आपली लोकप्रियता पूर्वपदावर आणली आहे.
रेटिंग सुधारण्यासाठी काय केले टिक टॉक ने :
काही दिवसांपूर्वी टिक-टॉक आणि युट्यूब या दोन अॅप्लिकेशन्समध्ये श्रेष्ठ कोण? असा वाद निर्माण झाला होता. परिणामी दोन्ही कम्युनिटीमधील युजर्स मोठ्या प्रमाणावर एकमेकांविरोधात टीका करत होते. या वादाचा परिणाम टिक-टॉकचा रेटिंगवर झाला. अनेकांनी या अॅपविरोधात निगेटिव्ह रिव्ह्यू लिहिण्यास सुरुवात केली. परिणामी टिक-टॉकचं रेटिंग ४.४ वरुन १.२ पर्यंत पोहोचलं होतं. परंतु टिक-टॉकने गुगल प्लेच्या मदतीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता पूर्वपदावर आणली आहे. त्यांनी निगेटिव्ह रिव्ह्यू, व्हिडीओज, कॉमेंट सर्व काही डिलिट करुन पुन्हा एकदा आपले रेटिंग ४.४ पर्यंत आणले आहे.
दरम्यान, टीक टॉक भारतात देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जवळपास १ कोटी १५ लाख भारतीय नेटकरी अॅपचा वापर करतात. विशेष म्हणजे हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जास्त व्हूज मिळवणारे टिक-टॉकर्स या अॅपवरुन पैसे देखील कमावतात.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा
Rajesh Bhaiya Tope is a real Yodhhao or Senapati