| मुंबई | मागील दोन महिन्यांपासून कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे तणावात असलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण दुप्पटीचा कालावधीत मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही कमी झाला असून, बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.(Mumbai corona statistics)
मुंबईत दरदिवशी कोरोनाचा संसर्ग झालेल्या दीड हजार रुग्णांची नोंद होत आहे. त्यात मंगळवारी मोठी घट दिसून आली. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ५० हजाराच्या पुढे गेला आहे. मंगळवारी १,०१५ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या १ हजार ७५८ झाली आहे, तर ९०४ जण एकाच दिवसात करोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत दररोज शेकडो लोकांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत असताना आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वाची माहिती बुधवारी दिली. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. मुंबईतील रुग्णांचा डबलिंग रेटचा कालावधी वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईचा डबलिंग रेट २४.५ दिवस इतका झाला आहे. राष्ट्रीय सरासरी १६ दिवस इतकी आहे. मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे आदित्य यांनी म्हटलं आहे. मृत्यूदर कमी होऊन ३ टक्के इतका झाला असून राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आला आहे. मुंबईतील डिस्चार्ज रेट ४४ टक्के इतका असून, धारावीतील डबलिंग रेट ४२ दिवस इतका आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केला आहे.(Mumbai corona statistics)आज @mybmc च्या आयुक्तांकडून एक चांगली बातमी:
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 10, 2020
काल पर्यंत,
१. मुंबईचा डबलिंग रेट २४.५ दिवस. (राष्ट्रीय सरासरी १६ दिवस)
२. मृत्यू दर कमी होऊन ३% झाला आहे (जवळपास राष्ट्रीय सरासरीइतके)
३. डिस्चार्ज रेट: ४४%
४. धारावीतील डबलिंग रेट: ४२ दिवस
आतापर्यंत मुंबईत २ लाख ३३ हजार ५७० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीचा सरासरी दर ३ टक्के आहे. मात्र पश्चिम उपनगरातील मालाड, दहिसर, कांदिवली या भागात रुग्णवाढीचा वेग ५ टक्के आहे. आतापर्यंत २२,९४२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.(Mumbai corona statistics)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .