रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येते..! संजय राऊत यांचा घणाघात..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’, अशा शब्दात ट्वीट करत संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. ९ एप्रिल रोजी राज्य सरकारने घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अजूनही राज्यपालांची प्रस्तावाला मंजूरी दिलेली नाही. यावरुन संजय राऊत यांनी राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये, असं म्हटलं आहे.

तसेच कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत बोलताना सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी प्रस्तावाला मंजूरी दिलेली नाही, असं थोरात यांनी सांगितलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *