सुनील केदार भंडाऱ्याचे तर विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्री पद..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करत आहेत. पालकमंत्रिपदाची जबाबदारी आता त्या त्या भागातील नेत्यांकडे तात्पुरते स्वरूपात आले आहेत.

कॉंग्रेस मंत्री विश्वजीत कदम यांच्या जागी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांच्याकडे भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्तास सोपवण्यात आली आहे. तर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तात्पुरते सुपूर्द करण्यात आले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयामध्ये अंशत: बदल केल्याचा उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे

सुनील केदार यांच्याकडे पशु दुग्धविकास मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आहे. सुनील केदार यांच्याकडे आधीच वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती, त्यात आता भंडाऱ्याची भर पडली आहे. विजय वडेट्टीवारांकडे मदत आणि पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण खातं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *