कंपनी असावी तर अशी… IT कंपनीने बाजारपेठेत उडवली खळबळ, लाभांशाची करणार लयलूट

मुंबई : शेअर बाजारातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला आहे, पण आयटी क्षेत्रातील नामवंत कंपनीचा शेअर आता आपल्या शेअरधारकांना प्रचंड कमाई करून देणार आहे. आयटी (तंत्रज्ञान) क्षेत्रातील कंपनीने आपल्या भागधारकांना मोठा लाभांश जाहीर केला असून हा लाभांश चांगल्या शेअरच्या किमतीइतका भरमसाठ आहे. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर या कंपनीने आपल्या भागधारकांना प्रत्येक शेअरवर तब्बल २४० रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा दहा वर्षांतील हा सर्वात मोठा लाभांश असून या लाभांशाची रेकॉर्ड तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

लाभांशची रेकॉर्ड तारीख काय
मार्च २०२४ तिमाही निकालानंतर ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर कंपनीने २४० रुपयांचा लाभांश जाहीर केला असून हा लाभांश २०१४ नंतरचा सर्वाधिक आहे. कंपनीने यापूर्वी २०१४ मध्ये ४८५ रुपये लाभांश जाहीर केला होता. लाभांशाची रेकॉर्ड तारीख ७ मे निश्चित करण्यात आली होती तर लाभांश २३ मे रोजी किंवा त्यापूर्वी जमा केली जाईल.

आतापर्यंत २१०० रुपये लाभांश
गेल्या वर्षी कंपनीने २२५ रुपये, २०२२ मध्ये १९० रुपये आणि २०२१ मध्ये २०० रुपये लाभांश जाहीर केला होता. ओरॅकल फायनान्शियलने २०१४ पासून आतापर्यंत प्रत्येक शेअरवर २,१०० रुपये लाभांश वितरित केला आहे.

तिमाहीत नफा घटला
ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेसचा निव्वळ नफा मार्च २०२४ च्या तिमाहीत एक चतुर्थांश कमी होऊन ५६०.१ कोटी रुपयांवर आला तर EBIT मार्जिन ०.४०% वाढून ४४.७% झाले. तसेच उत्पादन परवाने आणि आयटी सोल्यूशन्स या कंपनीच्या दोन्ही व्यवसाय विभागांच्या महसुलात वाढ झाली आहे.

शेअर्सचा परतावामोठ्या लाभांशाच्या घोषणेवर ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरच्या शेअर्सने गुरूवारी २५ एप्रिल रोजी ३% उसळी घेतली. बीएसईवर शेअर्सची किंमत ७,५८० रुपयांवर पोहोचली मात्र, प्रॉफिट बुकींगच्या जोरदार दबावाखाली शेअर्स घसरला. सध्या बीएसईवर २.१२% घसरणीसह शेअर्सची किंमत ७,२०३ रुपये आहे. कंपनीचा शेअर्स यंदा ६६ टक्क्यांनी वधारला असून मागील वर्षी २६ एप्रिल २०२३ रोजी शेअर्स ३,४०८.९५ रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता. तर शेअर्सचा १ एप्रिल २०२४ रोजी ९,०२१.४० रुपयांचा विक्रमी उच्चांक होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *