मुंबई :आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन.. जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. ते 1980 साली .. तेंव्हापासून त्यांना वेगवेगळे अध्यक्ष लाभत गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पासून तर जे पी नड्डा यांच्यापर्यंत…! त्याचाच हा मागोवा..
भाजपचे पाहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी होते. त्यानंतर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना 1986 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले. 1991 मध्ये ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले. तर 1993 साली लालकृष्ण अडवाणी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दुसऱ्यांदा अडवाणी यांना हे स्थान देण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ नेते कुशाभाई ठाकरे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली.
2000 साली बंगारू लक्ष्मण यांची भाजप अध्यक्षपदी निवड झाली. 2001 मध्ये जन कृष्णमूर्ती यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली. 2002 मध्ये केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 2005 मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2010 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2013 साली राजनाथ सिंह दुसर्यांदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले. यानंतर 2014 साली अमित शहा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. ऐतिहासिक विजयानंतर 2019 असल्याने जेपी नड्डा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.. सध्या तेच अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.