| मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे सगळया देशात गेली ४० दिवस लॉक डाऊन आहे. त्याचा परिणाम इतर क्षेत्रांसोबत मनोरंजन क्षेत्रावर देखील पडला आहे. हा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीत. लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.
दरम्यान, चित्रपटांचे शूटिंग जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. जुलै महिन्यात शूटिंगला जरी परवानगी मिळाली तर शूटिंगच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे.
यावरच आता मराठी टीव्ही इंडस्ट्रीत एक मालिका येते आहे. विशेष म्हणजे मालिकेतील सर्व कलाकार आपल्या घरात बसूनच शूट करणार आहेत. ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ असे या मालिकेचे नाव असणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मालिकेचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले करणार असून, यामध्ये मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, सखी गोखले, सुव्रत जोशी, आनंद इंगळे हे या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत.