| नवी दिल्ली | लॉकडाऊनसारखा उपाय योजल्यानंतरही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण विरोधकांनी सांगावे, त्यांनी काय केलेय ते, असे आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिले आहे.(amit shah gives confession on lockdown)
कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच भाजपाने व्हर्च्युअल रॅलींना सुरुवात केली आहे. त्यादरम्यान आज ओदिशामधील जनसंवाद रॅलीला अमित शाह यांनी संबोधित केले. त्यावेळी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, कोरोनाशी लढताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण विरोधी पक्षाने सांगावे की, त्यांनी या काळात काय केले आहे ते. कुणी स्वीडनमधील तर कुणी अमेरिकेतील लोकांशी चर्चा करत आहे. या चर्चेपलीकडे तुम्ही काय केले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्वरित मदत म्हणून १.७ लाख कोटी रुपयांचे गरजूंमध्ये वाटप केले आहे. तसेच या काळात सुमारे तीन लाख उडिया बांधवांना देशातील विविध भागांतून परत आणले आहे. त्यांची सुरक्षा आणि घरवापसीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रमिक ट्रेन चालवल्या.(amit shah gives confession on lockdown)
यावेळी अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाचे राजकारण केले. मात्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी आपले सरकार हे गरीब, आदिवासी आणि दलितांचे सरकार असेल, असे सांगितले होते. मोदी जे बोलतात, ते करून दाखवतात. दरम्यान, मोदींनी साठ कोटींहून अधिक गरिबांचे जीवनमान उंचवावे यासाठी खूप मोठे काम केले. तसेच रामजन्मभूमीचा प्रश्न मोदी सरकारने न्यायालयात अचूक बाजू मांडल्याने सुटल्याचा दावाही अमित शाह यांनी केला.(amit shah gives confession on lockdown)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .