मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलय. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. परतू नागरिक काहींना काही कारण काढून घर बाहेर पडत आहे यामुळे प्रशासनाला कडक कारवाई कराव लागत आहे.
आता करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मास्क बंधनकारक केलं आहे. यासंबंधीचा निर्णय महापालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचं म्हणजे मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो. तसंच अटकही केली जाऊ शकते. महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निरीक्षणांनुसार सोशल डिस्टन्सिंग याशिवाय मास्कचा वापर केल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतरही करोनाचा फैलाव होण्यावर नियंत्रण आणलं जाऊ शकतं असं समोर आलं आहे. यामुळेच सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रवीण परदेशी यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे या निर्णयानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी रस्ते, रुग्णालय, मार्केट तसंच इतर ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क घालणं बंधनकारक आहे. कितीही महत्त्वाचं कारण असलं तरी मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय आपल्या खासगी किंवा कार्यलयीन वाहनात फिरतानाही मास्क बंधनकारक असणार आहे.
तसंच महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बैठक, कार्यक्रम तसंच कामाच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे. हे मास्क केमिस्टकडे उपलबध असतील किंवा घऱात धुवून पुन्हा वापरु शकणारे असू शकतील असंही महापालिकेने सांगितलं आहे.
तसेच जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला दंड ठोठावला जाऊ शकतो तसंच अटकेची कारवाईही केली जाऊ शकते असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे प्रशासन आता कडक भूमिका घेत आहे.