| मुंबई | निसर्ग चक्रीवादळानंतर भाजपने तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची शरद पवार यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार यांनी म्हटले की, भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं उभी केली. मला आनंद आहे, त्यांचं अभिनंदन, असा उपरोधिक टोला पवारांनी हाणला.
गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. यानंतर आता शरद पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या मुद्द्यावरून पाटील यांनी सोमवारी पवारांसह मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली होती.
कोकणाला वादळाचा तडाखा बसताच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तातडीने तिथे पोहोचले. भाजपचे अनेक स्थानिक आमदार तेथे गेले. त्यांनी मदत केली. भाजपने पत्रे, ताडपत्रे व प्लास्टिक असा सोळा ट्रक माल रवाना केला. आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .