समजून घ्या: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्या का वाढताना दिसत आहे..!


मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा झपाट्याने वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉटही घोषित करण्यात आले आहे. मात्र मुंबई कोरोना संसर्ग वेगाने होण्याचं नेमकं कारण काय असेल याची चाचपणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या गेल्या काही दिवसातील वाढीची चार प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे.

1. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना व्हायरस संशयित रुग्णांची तपासणीची क्षमता वाढवण्यात आली आहे. 

2. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहिम तीव्र केली. तसेच, लक्षणे न दाखवणाऱ्या मात्र पॉझिटिव्ह पेशंटच्या नजीक संपर्कात आलेल्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत.

3. सर्वात जास्त केसेस वरळीच्या एका पॉकेट एरियातच आढळून आल्या आहेत.

4. वॉक्हार्ट हॉस्पिटलमधील मोठ्या संख्येचा कर्मचारी वर्ग कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

5. मुंबई महापालिका क्षेत्रात वाढलेल्या जास्त केसेस या जी दक्षिण विभागातील (ज्यात वरळीचा समावेश) आहे. आणि त्यातील 99 टक्के केसेस हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील लोकांना मुंबई महापालिका प्रशासनानं यापूर्वीच क्वारंटाईन केले आहे आणि त्यांच्या तपासण्याही सुरु केल्या आहेत.

6. धारावीतील आजपर्यंत सापडलेल्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह केसेसचं निझामुद्दीन मरकज कनेक्शन असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. धारावीत आतापर्यंत सापडलेल्या सर्व 13 केसेस या निझामुद्दीनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील होत्या. तसेच धारावीतील सर्व केसेस या धारावीतील मशिदीतून पसरलेल्या आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील 1 कोटी 20 लाखांची लोकसंख्या ही जास्त घनता असलेल्या भागांत राहते. या ठिकाणच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, या जास्त घनता असलेल्या क्षेत्राकडे महापालिका विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे प्रशासन योग्य दिशेने वाटचाल करत आहे हे नक्की.


1 Comment

  1. आपण कोरोना व्हायरसचा मुकाबला छान करत आहात, त्यास यश येईलच। काम जारी करण्यात यावा। यश आपलेच आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *