अत्यंत कमी लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या, त्यात dislike चा तुफान पाऊस, मोदींचे भाषण पुन्हा बुडाले..!

| मुंबई | सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश संकटात असताना आज देशाला सोशल मिडीयाच्या माध्यामातून संबोधित केले. परंतु सोशल मिडीयावरील त्यांना प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. कारण त्यांच्या या भाषणाला आता लाईक ऐवजी मोठ्या प्रमाणात डिसलाईक येवू लागल्या आहेत. त्यामुळे भाजप IT सेलवर ते बटणच काढून टाकण्याची नामुष्की ओढवली आहे.

मोदींच्या भाषणाला नकारात्मक येणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या युट्यूबवरून डिसलाईकचे बटन हटविण्यात आले. त्याचे कारण म्हणजे, पाच मिनीटामध्येच 4400 डिसलाईक आणि 2600 लाईक होते. तर, फक्त 2124 जण लाईव्ह पाहत होते. डिसलाईक वाढण्याचा धोका नको म्हणून भाजपने ते बटनच चालू केले नाही.

देशामध्ये सर्वात जास्त सोशल मिडीयाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक भाषणाला लाईक व कमेंट मोठ्या प्रमाणात येत होत्या. परंतु कोरोना ह्या जागतिक महामारीच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयावर सुरुवातीला जनता समाधानी होती. परंतु जसे-जसे लॉकडाऊन वाढत गेले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढू लागली.

त्यानंतर ज्या-ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले त्या-त्या वेळी त्यांनी देशातील बेरोजगारी बाबत कोणताही शब्द काढला नाही त्यामुळे त्यांच्यावर असलेला देशातील विशेष करून युवा वर्गाचा विश्वास उडू लागला व त्यांच्या प्रत्येक भाषणाला लाईक पेक्षा डिसलाईक मोठ्या प्रमाणात येवू लागल्या. त्यामुळे ज्या सोशल मिडीयाच्या माध्यामातून मोदी लोकप्रिय झाले त्याच माध्यामातून ते बेदखल ही होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *