
| मुंबई | जवळपास सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावाचे वेगळे रसायन सत्तेत आले. राज्याचं नेत्तृत्त्व आपल्या खांद्यांवर पेलत, इतर पक्षांच्या नेतेमंडळींना सोबत घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आव्हानं पेलली. अशा या मुख्यमंत्र्याचा आज ६०वा वाढदिवस. या खास दिवसाचं औचित्य साधत शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत.
आयुष्याच्या एका नव्या वळणावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आता त्यांनी हिमालयाचं नेतृत्त्व करण्यासाठी पुढची वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री आणि एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून मुख्यंमंत्र्यांनी त्यांची संयमी बाजू दाखवली. सोबतच वेळ पडल्यास ते कठोर शासकही झाले, हीच बाब अधोरेखित करत सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीतही त्यांना अग्रस्थान मिळाल्याचं बाब अग्रलेखात नमूद करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांना राज्यात सरकार चालवणं जमणार नाही, असं म्हणणाऱ्या विरोधकांवर आणि भाजपच्या राजकीय वृत्तीचा ‘फेकू’ असा उल्लेख, त्यावर टीका करत आता ते सर्व थंड पडले असल्याचा टोलाही सामनातून लगावण्यात आला.
राजकीय वर्तुळामध्ये युवा नेते म्हणून पदार्पण करणाऱ्या ठाकरे यांच्यावर वयाच्या जवशळपास ‘साठी’च्याच टप्प्यात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. या प्रवासात त्यांनी चढउतार पाहिले, अपमान आणि टीकेचाही सामना केला. या साऱ्यामध्ये याची काही कुवत नाही, याला काही कळत नाही असं म्हणणाराच पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि राज्याचा मुख्यमंत्रीही झाला. हे मुख्यमंत्र्यांचेच उदगार अग्रलेखात नमूद करण्यात आले. जगात आपलं असं एकमेव उदाहरण असेल ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली, या वाक्याचं स्पष्टीकरण देतेवेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ‘सामना’च्या मुलाखतीत ही बाब मांडली होती.
विरोधकांचे डावपेच, सोबत कोरोना व्हायरससारख्या महामारीचं गिळंकृत करण्यासाठी उभं ठाकलेलं आव्हान यातची मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे सातत्यानं जनतेची साथ देताना दिसले आणि यापुढंही दिसतील असा विश्वास अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री