| सोलापूर : महेश देशमुख | माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील आदिशक्ती शिक्षण संस्था संचलित आदर्श पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे यांच्या कल्पनेतून आदर्श परिवारातील सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकरीता ‘वॉक फॉर हेल्थ’ म्हणजे आरोग्या साठी चालूया.. हा उपक्रम राबविण्यात आला.
आरोग्याप्रती सजग असणार्या पालक वर्गानेही ३० नोव्हेंबर रोजी ३ कि.मी, ५ कि.मी व १० कि.मी अंतराच्या (१६ वर्ष वयोगटाखालील व १६ वर्ष वयोगटावरील अशा दोन गटांत) ‘स्पीडोमीटर’अॅपद्वारे घेण्यात आलेल्या चालण्याच्या व्हर्च्युअल स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला.
या उपक्रमांतर्गत १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर२०२० दरम्यान सराव सत्र घेण्यात आले. स्पर्धा आयोजकांनी वॉट्स अॅप ग्रूपच्या माध्यमातून स्पर्धकांना सातत्याने प्रोत्साहन देत सराव करण्यास उद्युक्त केले.
या स्पर्धेस माढा तालुक्यातूनच नव्हे तर देश विदेशातील स्पर्धकांकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत एकूण १९४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक सहभागी स्पर्धकास ऑनलाईन सर्टिफिकेट व विजेत्यांना सन्मान चिन्ह व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. जयंत करंदीकर यांच्या शुभहस्ते झाले. सोशल डिस्टंन्शिंगचे पालन करुन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमात उत्साही स्पर्धक सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेत आनंद लुटताना आढळले तसेच अनेक सकारात्मक व बोलक्या प्रतिक्रिया देखील या कार्यक्रमादरम्यान आल्या.
कुर्डुवाडीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘मॅरेथॉन’सारख्या स्पर्धांची ओळख व अनुभव देण्याची संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच साकारता येईल व स्पर्धकांचा उत्साह पाहता भविष्यात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येईल असे आश्वासन संस्थेच्या प्रकल्प संचालिका सौ. पूजा सुरवसे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिले, उत्कृष्ट नियोजनाने ही स्पर्धा साकारण्यात आल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया स्पर्धकांनी नोंदविल्या.
स्वप्ने ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत, म्हणुनच तुमच्या स्वप्नांसाठी व निरोगी आरोग्यासाठी नियमित चाला असा संदेश या स्पर्धेच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे यांनी दिला. याकरीता माढा तालुका व पंचक्रोशीतून सुरवसे या दांपत्यांचे कौतुक होत आहे.
स्पर्धेत ३ कि.मी.१६ वर्ष वयोगटाखालील प्रथम क्रमांक ओम देवकर, द्वितिय अपेक्षा आसबे, तृतीय पारितोषिक मिहिर बैरागी यांनी तर १६ वर्षाच्या पुढील गटात प्रथम क्रमांक प्रज्ञा कन्हेरे, द्वितीय निलेश देशमुख, तृतीय पारितोषिक रामचंद्र खारे यांना मिळाले तसेच ५ किलोमीटर १६ वर्षा खालील वयोगट प्रथम क्रमांक अभिषेक वाघ, द्वितीय अंतरा पोळ, तर तृतीय क्रमांक शिवराज लोंढे यानी पटकाविला तर १६ वर्षावरील वयोगट मध्ये प्रथम क्रमांक जयवंत भोरे, द्वितीय शरद लोंढे तृतीय धनंजय कुणाळे याना मिळाला. १० किलोमीटर १६ वर्षाखालील वयोगटात प्रथम ऋषिकेश करळे, द्वितीय करण सुरवसे, तृतीय ओंकार जाधव तसेच १६ वर्षावरील वयोगटात प्रथम क्रमांक उमेश पाटील, सारंग पाटील, द्वितीय नितीन मराठे, तृतीय शंकर चव्हाण यांना हा बहुमान मिळाला ज्येष्ठ नागरिका मध्ये प्रथम क्रमांक तुकाराम शिंदे,द्वितीय सगजान कांबळे,तृतीय शारदा बांगर व सर्व चौथा, पाचवा आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेले विजेते स्पर्धक यांचे आदर्श परिवाराकडून पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .