
| नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने रिटर्न भरण्याची अखेरची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना आपल्या रिटर्नसोबत ऑडिट रिपोर्ट लावावी लागत नाही, ते 2019-20 साठी आपले रिटर्न 31 डिसेंबरपर्यंत जमा करु शकतात. पहिले यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 ठरवण्यात आली होती.
वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार करदात्यांसाठी आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 निश्चित करण्यात आली आहे, ज्यांच्या रिटर्न्सचे ऑडिट करावे लागेल.
अनेकवेळा पुढे ढकलली आहे तारीख :
यापूर्वी मेच्या सुरुवातीस सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्राप्तिकर परताव्याची अंतिम तारीख 31 जुलै ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली. आता ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
वित्त वर्ष 2018-19 साठी 30 नोव्हेंबरपर्यंत दाखल करायची आहे आयटीआर :
कोरोना काळात केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा देत आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी डेडलाइनला 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी याची अखेरची तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली होती.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री