| लखनौ | उत्तर प्रदेशात जंगलराज आहे अशी टीका करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांनी ही ट्विट करत ही टीका केली आहे. उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्या माणसांना आधार देण्यासाठी आपण जातो. मात्र शोकसागरात बुडालेल्या एका कुटुंबाला भेटायला गेलो तरीही सरकार आम्हाला घाबरवतंय. एवढं घाबरु नका मुख्यमंत्री महोदय या आशयाचं ट्विट करत राहुल गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, सोशल नेटवर्किंगवरही काँग्रेसच्या समर्थकांनी #डरपोक_योगी या हॅशटॅगच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाईचा विरोध केला आहे. राहुल यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर अवघ्या तासामध्ये #डरपोक_योगी या हॅशटॅगवर २० हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. पीडितेच्या नातेवाईकांना भेटायला जाणं गुन्हा आहे का?, योगी सरकार नक्की कशाला घाबरतयं असे अनेक प्रश्न काँग्रेस समर्थकांनी ट्वीटरवरुन उपस्थित केले आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .